घरक्रीडायामुळे पृथ्वी शॉला टी-२० वर्ल्ड कप संघात घ्यायला हवं; माजी क्रिकेटपटूचं मत

यामुळे पृथ्वी शॉला टी-२० वर्ल्ड कप संघात घ्यायला हवं; माजी क्रिकेटपटूचं मत

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये शानदार कामगिरीबद्दल भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज आणि भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉचे कौतुक केलं आहे. पृथ्वी शॉने आयपीएल २०२१ मध्ये ८ डावांमध्ये ३०८ धावा केल्या. आयपीएल १४ मध्ये बायो बबलमध्ये कोरोनाच्या एन्ट्रीनंतर आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे.

आयपीएल २०२१ मध्ये शानदार कामगिरी करूनही पृथ्वी शॉची इंग्लंड दौर्‍यासाठी निवड करण्यात आली नाही. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी शॉची भारतीय संघात निवड व्हायला हवी, असा विश्वास चोप्राने व्यक्त केला. आपल्या यू ट्यूब वाहिनीवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, “आम्ही आधीच सांगितलं होतं की पृथ्वी शॉ आयपीएल स्पर्धेत चांगलं काम करेल. त्याचा स्ट्राइक रेट आयपीएलमध्ये चांगला होईल. त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याने सहा चेंडूत ६ चौकार ठोकले. पहिल्या षटकात सहा चौकार ठोकणे सोपे नाही.”

- Advertisement -

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली. त्याने ज्या प्रकारचे कौशल्य व दृष्टीकोन दाखविला. आम्हाला जुना पृथ्वी शॉ दिसला ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं होतं. अशाच प्रकारे शॉ फलंदाजी करत असेल तर टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याचं नाव सुरुवातीला असायला हवं. त्याने दाखविलेला फॉर्म, आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -