Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र एकाच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तब्बल २२ मृतदेह कोंबले, बीडमधील थरारक घटना

एकाच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तब्बल २२ मृतदेह कोंबले, बीडमधील थरारक घटना

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान अनेक रुग्णालयातील स्थिती गंभीर बनत आहे. एकीकडे रुग्णांना ठेवण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नसून दुसरीकडे रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध होत नाही. रुग्णालयांमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स शिल्लक नसल्याने कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेल्याचा प्रकार समोर आला होता. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडला आहे.

बीड अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ मृतदेहांना एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धकादायक घटना उघडकीस आली. रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एकाचवेळी अत्यंत वाईट अवस्थेत हे मृतदेह नेले जात होते. या घटनेमुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांचा नरक यातना संपत नसल्याचे दिसतेयं, यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासनाविरोधात नागरिक संपात व्यक्त करत आहेत

- Advertisement -

बीड जिल्हात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये मृतांचे अक्षरश: ठीग जमा होत आहे. यात अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांवर ताण निर्माण होत आहे. दरम्यान बाजूच्या तालुक्यातील कोरोना रुग्णांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृतांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र मृत्यूनंतरही शांती मिळण्याऐवजी कोरोना रुग्णांचा मृतदेहांची परवड सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

bodies of 22 covid 19 patients transported in a single ambulance in maharashtra beed
एकाच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तब्बल २२ मृतदेह कोंबले, महाराष्ट्रातील थरारक घटना

- Advertisement -

रविवारी (२५ एप्रिल) दुपारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून चक्क २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मृत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.

जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला फक्त दोनच रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी पडत आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक केली जाते. तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय प्रशासनाने १७ मार्च २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप रुग्णवाहिका मिळाल्या नाहीत. रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आपत्कालिन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.


व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिनेनं दिला बाळाला जन्म, आई आणि बाळ क्वारंटाइन


 

- Advertisement -