घरCORONA UPDATECoronavirus Breaking: मुंबईतील कोरोनाबाधित हॉटस्पॉट २४१; १८ बळी

Coronavirus Breaking: मुंबईतील कोरोनाबाधित हॉटस्पॉट २४१; १८ बळी

Subscribe

महाराष्ट्रात ४२३ कोरोनाचे रुग्ण सापडले असताना त्यातील २३६ रुग्ण हे एकट्या मुंबईतच आहेत. तीन ते चार दिवसांमध्ये मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यातील काही रुग्ण हे मुंबईच्या झोपडपट्ट्यामध्ये आढळले आहेत. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण सापडल्याने मुंबईमध्ये कोरोनाचा स्फोट होऊन मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. सध्या मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या २१२ वरुन २४१ वर पोहोचली आहे.

mumbai hotspot

- Advertisement -

mumbai hotspot

मुंबईमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. त्यातही मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये रुग्णांची वाढती संख्या चिंतेचे कारण बनत आहे. वरळी कोळीवाडा, गोवंडी, पवई, घाटकोपर, अंधेरी येथील झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यातच गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने शिरकाव केला. धारावीतील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या घरातील सात जणांना होम क्वारंटाईन केले असून तो राहत असलेली इमारत सील केली आहे.

- Advertisement -

त्यापाठोपाठ वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या मात्र धारावी परिसरत काम करणाऱ्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. धारावीसारख्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडीत कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या धारावी कोरोनाच्या रडारवर आली आहे. धारावीमधील घरे 10 बाय 10 ची असून प्रत्येक घरांमध्ये सात ते आठ किंवा त्यापेक्षा अधिकजण रहातात. तसेच नेहमीच गर्दी असलेल्या धारावीमध्ये सोशल डीस्टनिग कसे राखले जाणार हा प्रश्नच निर्माण झाला आहे. धारावीत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे महापालिका व राज्य आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

त्याचप्रमाणे वरळी कोळीवाड्यात १२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३ जण संशयित रुग्ण आहेत तर १७६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरळी कोळीवाड्यासारख्या ठिकाणी कोरोनाने घातलेला धुमाकूळ पाहता धारावी व मुंबईतील अन्य झोपडपट्ट्यांमधील परिस्थिती अधिकच गंभीर आहे.

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २४१ पेक्षा अधिक परिसर हे प्रतिबंध केले असून त्यामध्ये अनेक झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. यात डोंगरी, मोहमद अली रोड, मोमीनपुरा, भोईवड़ा, शिवडी, वरळी कोळीवाडा, जोगेश्वरी कोळीवाडा, वाकोला, कुरार व्हिलेज, शिवाजी नगर, चेंबूर, ट्रॉम्बे यासारख्या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. त्यातच मुंबईतील घाटकोपर, चेंबूर, भांडुप, जोगेश्वरी, गोरेगाव, वरळी आदी परिसरातील झोपडपट्टीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने मुंबईतील सर्वाधिक दाटीवाटीची आणि सोशल डिस्टनसिग ठेवण्यास अशक्य असलेल्या झोपडपट्ट्याना कोरोनाची लागण झाल्याने मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील कोरोनाची आकडेवारी

मुंबई 236
पुणे 61
ठाणे 45
सांगली 25
अहमदनगर 17
नागपूर 16
बुलढाणा 5
यवतमाळ 4
सातारा 3
औरंगाबाद 3
कोल्हापूर 2
रत्नागिरी 1
सिधुदुर्ग 1
गोंदिया 1
जळगाव 1
नाशिक 1
उस्मानाबाद 1

महाराष्ट्र – 423

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -