घरमुंबईCoronaVirus: शिवसेनेच्या 'त्या' आमदाराची कोरोनावर मात!

CoronaVirus: शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराची कोरोनावर मात!

Subscribe

रूग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर कोरोनावर त्यांनी मात केली.

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता राज्यातील कॅबिनेट मंत्रयानंतर आता शिवसेनेच्या आमदारानेही कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी रात्री त्या आमदाराला डिस्चार्ज देण्यात आला. ठाणे महापालिका क्षेत्रात उपचारानंतर बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण २७ टक्के आहे. ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजारावर पोहचली आहे. मात्र उपचारानंतर बरे झालेल्या रूगणांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या २७३ इतकी आहे.

ठाण्यात लोकप्रतिनिधींनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेट मंत्री आणि माजी खासदार हे कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर ते बरे होऊन घरी परतले आहेत. शिवसेनेच्या एका आमदाराचा कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रूग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर कोरोनावर त्यांनी मात केली. कोरोनामुक्त होऊन शुक्रवारी त्यांना घरी सोडण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान ठाणे शहरात कोरोना कोव्हीड १९ रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोव्हीड बाधित आणि नाॅन कोव्हीड रूग्ण मिक्स होवू नयेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोव्हीड १९ रूग्णांसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कोव्हीड १९ च्या संशयित रूग्णांसाठी स्वतंत्रपणे उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा महानगरपालिकेच्यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोव्हीड१९ साठी निवडण्यात आलेल्या सर्व रुग्णालयामध्ये बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोना कोव्हीड १९ बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.


कळवण : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -