घरमहाराष्ट्रनाशिककळवण : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह

कळवण : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह

Subscribe

सर्व नऊ रिपोर्ट प्राप्त, कळवणकरांना दिलासा

कळवण येथे मंगळवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आज संबंधित रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील तपासणी साठी पाठवण्यात आलेले सर्व नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कळवणकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
          आतापर्यंत कोरोनापासून मुक्त कळवण शहरात शिवाजीनगर परिसरात मंगळवारी एका अकरा वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणादेखील सतर्क झाली होती. शिवाजीनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊन रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील एकूण नऊ जणांचे स्वाब तपासणी साठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते. आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हेक्षण करण्यात येत असून शनिवारी (दि.१६) दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये कळवणमधून पाठवण्यात आलेल्या सर्व नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -