घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजाराच्या पार

Coronavirus Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजाराच्या पार

Subscribe

मुंबईत मंगळवारी ७६९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या दहा हजार पार पोहचली. मुंबईतील रूग्णांची संख्या १० हजार ५२७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४१२ वर पोहचला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. बुधवारी ७६९ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून २ ते ४ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या २१५ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४१२ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २५ जणांमध्ये १९ जण दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १५ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १२ जण हे ६० वर्षांवरील, १२ जण हे ४० ते ६० वर्षांदरम्यान तर एकाचे वय ४० वर्षांखालील होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ४४३ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ७४९ वर पोहचली आहे. तसेच १५९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २२८७ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -