घरताज्या घडामोडीपावसाळ्यात कोरोनाचा धोका ५ पट वाढवणार; IITचा रिसर्च

पावसाळ्यात कोरोनाचा धोका ५ पट वाढवणार; IITचा रिसर्च

Subscribe

पावसाळ्यात कोरोनाचा धोका पाच पट वाढवणार असल्याचे IITच्या रिसर्चमधून समोर आले आहे.

देशात कोरोनाने अक्षरश: कहर केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असे बोले जात होते की, उन्हाळ्यात गर्मीमुळे कोरोना नष्ट होण्यास मदत होणार आहे. मात्र, असे अद्याप घडलेले नाही. आता उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदलाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये असे नोंदवले गेले आहे की, पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता असून अभ्यासानुसार आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात राहू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात कोरोनाचा धोका पाच पट वाढणार असल्याचे समोर आले आहे.

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण ८०% हून अधिक

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असून अशी परिस्थितीमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो.

- Advertisement -

जर आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त काळ टिकून राहिला तर मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होईल. दरम्यान, बरेच लोक या अभ्यासाशी सहमत नाहीत. – अमित अग्रवाल; प्राध्यापक

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ७६ हजार ५८३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ३३ हजार ६३२ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ३५ हजार २०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ७४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारताचा मृत्यूदर २.८०% आहे. जगातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र, भारताचा मृत्यूदर रशिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. रशियाचा मृत्यूदर १.२७% इतका आहे.


हेही वाचा – बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणारे चीनवर प्रश्न विचारत आहेत – रविशंकर प्रसाद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -