घरमहाराष्ट्रमुंबई हायकोर्टासमोर 'दि बर्निंग एसटी'; 'या' कर्तव्यदक्ष महिलेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

मुंबई हायकोर्टासमोर ‘दि बर्निंग एसटी’; ‘या’ कर्तव्यदक्ष महिलेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

Subscribe

मंत्रालय बस स्टॉपहून पनवेलला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बुधवारी सकाळी अचानक आग लागण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र महिला वाहकाचा सतर्कमुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. बसच्या इंजिनमधून धूर आणि आगीचे लोळ येताच महिला वाहकाने चालकाला बस थांबवण्याचे निर्देश दिले. तसेच मागच्या दारातून प्रवाशांना उतरण्यास सांगितले. तसेच १०१ क्रमांकांवर फोन करून पोलिसांना आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. मात्र, आग वाढत असल्याचे बघून या महिला वाहकाने हायकोर्टात तैनात असलेल्या पोलिसांकडे मदत मागितली. तेथील पोलीस कर्मचारीदेखील आग विझवण्यात त्यांच्या मदतीला धावून आले आहे.

सुगंधा शंकर हिले

काय आहे संपूर्ण घटना 

सुगंधा शंकर हिले असे महिला वाहकाचे नाव आहे. सुगंधा आणि चालक एस. बी. गायकवाड हे दोघेही पनवेल आगारात कार्यरत आहेत. सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पनवेल ते मंत्रालय मार्गवार एसटीच्या बस धावत आहेत. सुगंधा आणि गायकवाड हे दोघेही पनवेल ते मंत्रालय एसटी बस क्रमांक एमएच १४ बी. टी. ४४८१ या बसवर कर्तव्य बजावत होते. बुधवारी सकाळी पनवेलवरून निघालेली बस १० वाजून ५ मिनिटांनी मंत्रालय बस स्टॉपवर पोहोचली. नंतर १० वाजून १० मिनिटांनी प्रवाशांना घेऊन परत पनवेलला जात असताना हायकोर्टाच्या सिग्नलजवळ बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. इतकेच नव्हे तर आगीचे लोळसुद्धा बाहेर पडत होते. सुगंधाने लगेचच बस थांबवण्याचे निर्देश चालक गायकवाड यांना दिले. बस थांबताच सुगंधा यांनी प्रवाशांना मागचा दाराने बाहेर पडण्यास सांगितले. प्रवासी बाहेर पडताच या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. हायकोर्टासमोर कर्तव्यावर असलेले पोलीससुद्धा घटनास्थळी धाव आले. नंतर चालक गायकवाड यांनी बसमध्ये ठेवण्यात आलेले फायर सिलेंडर घेऊन आणि पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात अग्निशमन दलाची गाडीसुद्धा घटनास्थळी आली. तोपर्यंत आग विझवण्यात त्यांना यश आले होते. सुगंधा हिले या महिला वाहकाच्या धाडसामुळे प्रवाशांचे तर प्राण वाचले, शिवाय एसटी बसेसचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसानही टळले. या घटनेचा पंचनामा आझाद मैदान पोलिसांनी केला आहे. पोलिसांकडून चालक आणि वाहाकांचा दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक केले आहे.

- Advertisement -
एस. बी. गायकवाड

हायकोर्टातील पोलिसांची मदत

दैनिक आपलं महानगरशी बोलताना सुगंधाने सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा बसमध्ये फक्त दोन प्रवासी होते. कारण बस मंत्रालयातून पनवेलला जात असल्यामुळे प्रवासी नव्हतेच. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र चालक गायकवाड यांनीही प्रसंगावधान दाखवत लगेच हायकोर्टाचा बाजूला बस उभी केली. हायकोर्ट तैनात असलेल्या पोलीस जवानांनी परिस्थिती बघता पाण्याचा पाईप घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे काही कालावधीत आगीवर नियंत्र मिळवता येणे शक्य झाले. अन्यथा एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.

हेही वाचा –

होय, चीनने भारताच्या जमीनीवर कब्जा केलाय पण…; भाजपचं राहुल गांधींना उत्तर

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -