घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: आज १ हजार ४६ नव्या रुग्णांची नोंद; रुग्ण बरे होण्याचं...

Coronavirus Mumbai: आज १ हजार ४६ नव्या रुग्णांची नोंद; रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७० टक्के

Subscribe

मुंबईत आज ६४ जणांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात १ हजार ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १ हजार २२४ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५७११ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. १ हजार १९३ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७१ हजार ६८५ इतकी झाली आहे. तर २३ हजार ८२८ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईमध्ये शनिवारी १०४६ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३९ पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३६ जण हे ६० वर्षांवरील, तर २४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८८६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७० हजार १९४ वर पोहचली आहे. तसेच १ हजार १९३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७१ हजार ६८५ जणांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: आज ९५१८ नवीन रुग्णांचे निदान; तर २५८ मृत्यू


मुंबईत रुग्ण वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७० टक्के एवढं झालं आहे. १३ जुलै ते १८ जुलै पर्यंत कोरोना वाढीचा दर १.२६ टक्के एवढा होता. तर १८ जुलैपर्यंत ४ लाख ३३ हजार २२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर ५५ दिवस इतका झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -