Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई वसईत नवदाम्पत्याची आत्महत्या, एका आठवड्यातील दुसरी घटना

वसईत नवदाम्पत्याची आत्महत्या, एका आठवड्यातील दुसरी घटना

Related Story

- Advertisement -

शहरातील पूर्वेला असणाऱ्या एका उच्च्भ्रू सोसायटीत राहणाऱ्या नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. वसई शहरात एका दाम्पत्यानी आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना असून वसईत या दोन्ही घटनांमुळे खळबळ उडवून दिली आहे. १८ नोव्हेंबर रोजी भोईदा पाडा येथे राहणाऱ्या विष्णू पटेल (२८) आणि प्रतिभा पटेल (२२) या दाम्पत्यानी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या आर्थिक अडचणीतून झाल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

राहुल चव्हाण (२८) आणि ज्योती चव्हाण (२३) अशी आत्महत्या करण्यात आलेल्या नवदाम्पत्याची नावे आहेत. वसई पूर्वेतील एवरशाइन सिटी परिसरातील सेक्टर नंबर ४ मधील एक्युरिअस या उच्च्भू इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर हे दाम्पत्य राहण्यास होते. राहुल हा महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान असून अंधेरीत मेट्रो रेल्वे स्थानकावर तैनात होता. शुक्रवारी रात्री चव्हाण यांच्या घरातील लाईट बंद असल्यामुळे इमारतीत राहणारे राहुल चव्हाण यांचे नातेवाईकांनी तुळींज पोलिसांना कळवले. पोलिसांनी चव्हाण या दाम्पत्याच्या घरी येऊन खात्री केली असता आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे पोलिसांनी शेजारी आणि नातेवाईकांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता ज्योती ही बेडरूममध्ये निपचित पडली होती, तर दुसऱ्या खोलीत राहुलचा मृतदेह घरातील एका लोखंडी हुकला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

- Advertisement -

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवहविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालय येथे पाठवले असून याप्रकरणी प्राथमिक चौकशीवरून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल आणि ज्योती हे दोघे मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत होते अशी माहिती पोलिसांना नातलगांनी दिली. आर्थिक अडचणीतूनच या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ज्योतीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -