घरमुंबईकल्याणमध्ये टँकरमधील केमिकल पडून दाम्पत्य जखमी 

कल्याणमध्ये टँकरमधील केमिकल पडून दाम्पत्य जखमी 

Subscribe

कल्याणमध्ये केमिकल टँकरचे झाकण अचानक लीक झाल्याने टँकरच्या बाजूने दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्यावर केमिकल पडल्याने तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

कल्याण पश्चिमेतील वालधुनी येथील आंबेडकर चौकात रस्त्यावर जाणाऱ्या एका केमिकल टँकरचे झाकण अचानक लीक झाल्याने टँकरच्या बाजूने दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्यावर केमिकल पडल्याने तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  रविवार, २३ डिसेंबरच्या रात्री कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या साळसकर दाम्पत्य शॉपिंग करून घरी जात  असताना हा प्रकार घडला. यामध्ये जखमी झालेल्या पत्नी गौरी साळसकर हिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर केमिकल पडल्याने ती भाजली आहे.

सुदैवाचे मुलाला जास्त इजा नाही

तर पती गौरेश यांच्या डोळ्यात केमिकल गेल्याने एका डोळ्याने त्यांना दिसत नसल्याने त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीड वर्षाचा मुलगा तनिष किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, रविवारी रात्रीची ही एवढी गंभीर घटना घडून सुद्धा अद्यापही टँकर चालकाचा शोध न लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -