घरदेश-विदेश20 Rupees, नवी नोट लवकरच येणार - आरबीआय

20 Rupees, नवी नोट लवकरच येणार – आरबीआय

Subscribe

रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीयआय) आता २० रुपयांच्या नवीन नोटा लवकरच चलनात आणणार आहे. नवीन नोट कशी असेल याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नावावर असलेला नाण्याचे अनावरण केल्यानंतर आता रिझर्व बँक ऑफ इंडिया एक नवीन नोट चलनात आणते आहे. २० रुपयांची नवीन नोट लवकरच बाजारपेठात येणार असल्याची घोषणा आरबीआयने केली आहे. येत्या वर्षी २० रुपयांची नोट लॉन्च केली जाणार आहे. नवीन नोटा आल्यामुळे जुन्या नोटा या बाजारात तशाच रहाणार असल्याचे बँकने सांगितले आहे. मात्र विविध रंगात निघणारे भारतीय चलनामध्ये आता नवीन रंग जोडला जाणार आहे. नवीन नोट कशी असेल याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

२० रुपयांच्या नोटांचा होतो अधिक वापर

आरबीआयने यापूर्वी १०,५०,१००,५०० आणि २००० या चलनाच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये महात्मा गांधींच्या नवीन सीरीजच्या नोटा चलनात आणल्या होत्या. मागील अनेक वर्षात भारतात नवीन चलन आणल्यानंतर लोकांना त्याला चांगला प्रतिसाद दिला. ३१ मार्च २०१६ पर्यंत २० च्या नोटांची ४.९२ अब्ज रुपयांचे चलन बाजारात होते. २०१८ साली २० रुपयांच्या १० अब्ज नोटा चलनात होत्या. २० रुपयांच्या नोटांचा वापर चलनात वाढत असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -