घरमुंबईवाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी वाढली

वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी वाढली

Subscribe

कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी माहिती डोंबिवलीत पत्रकारांना दिली. 

”वाढत्या वाहतूक कोंडीला त्रस्त झालेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आता वाहतूक कोंडीतील गुन्हेगारीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे येथील सोनसाखळी चोरी आणि किरकोळ हाणामारीच्या प्रकारात वाढ झाल्याचे” मत कल्याण पोलीस परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. वाहन चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. वाहनं पार्किंग करण्याबाबत पुरेशी सुविधा नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहनं उभी करतात. त्यामुळे वाहन चोरीचे प्रकार वाढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक कोंडीबाबत उद्या १९ जुलै रोजी बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती पानसरे यांनी दिली.

”वाहतूक कोंडीचा फायदा घेत सोनसाखळी चोरण्याचे चोरांचे धाडस वाढत आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांच्या सोनसाखळ्या चोरुन मोटरसायकलवरून हे चोर पलायन करतात. तसेच अनेकदा वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे या वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी तसेच चोरांच्या शोधासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचे” पानसरे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – देशभरात ईव्हीएम ‘भारत छोडो’ आंदोलन

तुरूंगातून सुटलेल्या आरोपींवर करण्यात येणाऱ्या पुढील कारवाई बाबतही पानसरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ”कल्याण पोलीस परिमंडळात पाच विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तुरूंगातून सुटलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला हद्दपार करण्यात येत आहे. तसेच दहा वर्षापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे रेकॉर्ड तपासून, नव्या आरोपीचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. गेल्या दहा वर्षात पिस्तूलाचा वापर करणाऱ्या आरोपींची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याचे” पानसरे यांनी सांगितले. शहरात सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. स्कायवाॅकवर सीसीटीव्ही आणि लाईट लावण्यासंदर्भात मागणी केली आहे. तसेच प्रत्येक सोसायटीने सीसीटीव्ही लावणे गरजेचे असल्याचे मत पानसरे यांनी मांडले.

पेट्रोल पंपाची रोकड लुटणाऱ्या आरोपींना मेाक्का

काही दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपाची सुमारे १२ लाखाची रक्कम लुटून पळणाऱ्या ६ जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं होत. या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहितीही पानसरे यांनी दिली. तसेच आंधप्रदेश येथील टकटक गँग जेरबंद करण्यात आली असून नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमालही १५ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात परत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

डोंबिवलीत आणखी एका पोलीस ठाण्याचा प्रस्ताव

डोंबिवली शहरात पश्चिमेला विष्णूनगर तर पूर्वेला रामनगर टिळकनगर आणि मानपाडा ही चार पोलीस ठाणी आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याची हद्द खूप मोठी असून २७ गावांचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मानपाडा पोलीस ठाण्यांतर्गत दावडी अथवा काटई हे नवीन पोलीस ठाणे करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. पोलिसांचे संख्याबळ कमी असून त्यासाठी पाठपूरावा सुरु असून पोलिसांच्या वसाहती मोडकळीस आल्याने त्याबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -