घरक्राइमCrime News : बाईक चोरीच्या संशयावरुन मालवणीत तरुणाची हत्या; आरोपीला अटक

Crime News : बाईक चोरीच्या संशयावरुन मालवणीत तरुणाची हत्या; आरोपीला अटक

Subscribe

Crime News बाईक चोरीच्या संशयावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली आहे. सचिन दशरथ जैस्वाल (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबई : बाईक चोरीच्या संशयावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली आहे. सचिन दशरथ जैस्वाल (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच, इम्रान निसार अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला मालवणी पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. (Crime News Youth killed in Malvani on suspicion of bike theft The accused was arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, बाईक चोरीच्या संशयावरुन इम्रानने सचिनची बेदम मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बोरिवलीतील गोराई परिसरात आकाश संपत गायकवाड हा राहत असून सचिन हा त्याचा मित्र आहे. दोन दिवसांपूर्वी आकाश व सचिन हे दोघेही मालवणी परिसरात गांजा खरेदीसाठी आले होते. काही वेळानंतर आकाश एका गल्लीत गेला तर सचिन हा एका बाईकजवळ उभा होता.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime News : पुण्यात लाथाबुक्क्यांनी शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण

काही वेळानंतर आकाश बाहेर आला असता त्याला सचिन बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आला. त्याची काहीच हालचाल नव्हती. चौकशीदरम्यान सचिन हा बाईक चोर असल्याच्या संशयावरुन त्याला एका तरुणाने पकडून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

- Advertisement -

याप्रकरणी आकाश गायकवाड याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी इम्रान अन्सारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सचिनची मारहाण करुन हत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – Crime News : अटकेची भीती दाखवत महिलेकडून 11 लाखांची फसवणूक; आरोपीला राजस्थानातून अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -