घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : विदर्भात काँग्रेसच्या प्रचाराचा झंझावात, राहुल गांधींची शनिवारी भंडाऱ्यात...

Lok Sabha 2024 : विदर्भात काँग्रेसच्या प्रचाराचा झंझावात, राहुल गांधींची शनिवारी भंडाऱ्यात सभा

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भंडारा येथे काँग्रेसची पहिली प्रचारसभा उद्या शनिवारी पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी नागपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा होणार आहे.

भंडारा : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार राज्यासह संपूर्ण देशात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी उद्या शनिवारी (ता. 13 एप्रिल) विदर्भात येणार आहेत. भाजपाच्या पाठोपाठ काँग्रेसनेही विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन केले असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभांचा धडाका लावला आहे. (Lok Sabha Election 2024 Congress leader Rahul Gandhi campaign meeting at Bhandara)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भंडारा येथे काँग्रेसची पहिली प्रचारसभा उद्या शनिवारी पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी नागपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा होणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होत असल्याने त्या यशस्वी करण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी जोर लावला असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : कोणत्या आधारावर आम्हाला नकली म्हणता? उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या पाच मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता 17 एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता होईल. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने काँग्रेसने भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात रान उठविण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा विदर्भात झाल्या आहेत. आता काँग्रेस प्रचार सभांच्या माध्यमातून भाजपाला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी उद्या, शनिवारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ दुपारी तीन वाजता भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गजानन महाराज मंदिराच्या मैदानात जाहीर सभा घेतील. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

तर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रविवारी 14 एप्रिलसा विदर्भातील नागपुरात असलेल्या गोळीबार चौकात आयोजित प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा दुपारी चार वाजता होईल. या सभेच्या आधी खर्गे हे सकाळी दिक्षाभूमीला भेट देणार आहेत.

हेही वाचा… Jitendra Awhad : निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का? आव्हाडांची पोस्ट व्हायरल 

पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री सुनील केदार, माजी खासदार विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद आदी सक्रिय झाले असून त्यांनी प्रचार सभा, रॅली, चौकसभांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -