घरमुंबईबिल्डर सुपारीवालाने आगीचे खापर रहिवाशांवर फोडले

बिल्डर सुपारीवालाने आगीचे खापर रहिवाशांवर फोडले

Subscribe

परळच्या क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आग प्रकरणी बिल्डर अब्दुल सुपारीवाला याला बुधवारी रात्री अटक करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याला भोईवाडा कोर्टात हजर केले असता कोर्टाने अब्दुल सुपारीवाला याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

परळच्या क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आग प्रकरणी बिल्डर अब्दुल सुपारीवाला याला बुधवारी रात्री अटक करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याला भोईवाडा कोर्टात हजर केले असता कोर्टाने अब्दुल सुपारीवाला याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सुपारीवाला याला जाब विचारला असता, त्याने बिल्डींगमधील अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची होती, असे सांगत जबाबदारी झटकली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर आग लागली होती. या आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले होते.

इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही हे फ्लॅट विकण्यात आल्याचा आरोप यावेळी मुंबई पोलिसांच्या वतीने कोर्टात करण्यात आला. तसेच या इमारतीत आग विझवण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती, असेही सांगितले. इमारतीच्या ८ व्या मजल्यावर एक अनधिकृत बांधकाम आहे आणि एका अनधिकृत बांधकामावर मनपाने हातोडा चालवला आला होता, अशीही माहिती कोर्टाला या वेळी देण्यात आली. या अशा बेकायदा बांधकामामुळे इमारत राहण्यास धोकादायक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. या प्रकरणी सुपारीवाला याचे इतर सहकारी यात सहभागी होते का, याची माहिती घ्यायची असल्याने त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. तर बचाव पक्षाने २०१२ पासून आम्ही रहिवाशांना सोसायटी स्थापन करण्यास सांगितले. तरीही त्यांनी ती स्थापन केली नाही, असे म्हणत आपली जबाबदारी पूर्णपणे झटकली.

- Advertisement -

 

मनपालाही दोषी धरलेसोसायटी स्थापन करुन अग्निसुरक्षेची व्यवस्था लोकांनी करणे आवश्यक होते, असे बचाव पक्षाने म्हणत आगीचे सगळे खापर रहिवाशांवर फोडले. तसेच २०१२ पासून आम्ही ओसी आणि अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला, पण आम्हाला ती प्रमाणपत्रे मिळाली नाहीत, असे म्हणत मनपालही दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी विनोद मयेकर यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन त्याला अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -