घरCORONA UPDATEठाण्यातील क्यूरे रूग्णालय कोविड-१९ रुग्णालय म्हणून घोषित

ठाण्यातील क्यूरे रूग्णालय कोविड-१९ रुग्णालय म्हणून घोषित

Subscribe

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील क्यूरे रुग्णालय हे देखील कोविड- १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेवून कोविड-१९ बाधित रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सोयी उपलब्ध होण्यासाठी आता ठाण्यातील घोडबंदर रोड येथील क्यूरे रुग्णालय हे देखील कोविड- १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. यामुळे क्यूरे रूग्णालयासह शहरातील विविध कोविड रूग्णालयांमध्ये एकूण ६५०  बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना कोविड-१९ चा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने व दैनंदिन कोरोना कोविड-१९ ची लागण बऱ्याच नागरिकांना झाल्याचे वेळोवळी निदर्शनास येत असल्याने कोरोना कोविड-१९ बाधित नागरिकांना तातडीने इतर समाजातील नागरिकांपासून आयसोलेट करणे, उपचारासाठी रुग्णालयमध्ये स्वतंत्र विभागात दाखल करणे, रुग्णाच्या सर्व तपासण्या करणे, तसेच वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे इत्यादी कारणासाठी कोविड-१९ कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करणे आवश्यक असून त्यानुसार क्यूरे रूग्णालय कोविड रूग्णालय घोषित करण्यात आले आहे. दरम्यान कोविड बाधितांवर चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत, यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा सामान्य रुग्णालय (२५० खाटा ), कौशल्या रुग्णालय (६० खाटा), होरायझॉन रुग्णालय ( ६० खाटा), वेदांत रुग्णालय (१०० खाटा) काळसेकर रुग्णालय (१०० खाटा), ठाणे हेल्थ केअर रुग्णालय (५३ खाटा ) आणि आता क्यूरे रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बेथनी रुग्णालय या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये सध्या एकूण ३४ खाटांची सुविधा निर्माण केली असून यामध्ये कोमॉर्बिड संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे २० खाटांचा कोमॅार्बिड सस्पेक्टेड आयसोलेशन वॉर्ड निर्माण करण्यात आलेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी २५ खाटांची सुविधा कोमॉर्बिड सस्पेक्टेड रुग्णांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे. असे एकूण ७९ खाटांची क्षमता सध्या कोमॅार्बिड सस्पेक्टेड रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अतिरिक्त रुग्णांची व्यवस्था होणे आवश्यक आहे. तसेच कोविड सस्पेक्टेड रुग्णालयातील जे रुग्ण कोविड- १९ तपासणीनंतर  पॉझिटिव्ह येतील, असे सर्व रुग्ण इतर ठिकाणी सिम्टोमेटीक असिम्टोमॅटिक रुग्ण वर्गवारी करुन त्यांना त्या त्या फॅसिलिटी सेंटरमध्ये पाठविले जातात.

कोविड असिम्टोमॅटीक रुग्णांची संख्या जास्त असल्याने अशा रुग्णांना व ज्या रुग्णांचे वयोमान ५० वर्षापेक्षा जास्त आहे अशा रुग्णांना वैद्यकिय तज्ञांच्या देखरेखीखाली उपचारार्थ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील घोडबंदर रोड येथे क्युरे रुग्णालय कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रूग्णालयामध्ये १७ सिंगल बेडस्, २ डबल बेडस्, १ ट्रिपल बेड असे एकूण २० बेडस् उपलब्ध आहेत. तसेच जनरल वॉर्ड ०४ बेड व आय.सी.यु. ०३ बेड अशी सुविधा उपलब्ध आहे. असे एकूण २७ बेडस् उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांसह क्यूरे रुग्णालय कोरोना कोविड – १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -