घरमुंबईएपीएमसीत सीताफळ दाखल हंगामाला सुरुवात

एपीएमसीत सीताफळ दाखल हंगामाला सुरुवात

Subscribe

यंदा गतवर्षीच्या तुलेनत सीताफळळाच्या आवकीत घट झाले असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना पडणार आहे. गेल्या महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका शेतकर्‍यांना पडला असून त्यामुळे फळ मार्केटमध्ये फळांची आवक कमी होत आहे.

आब्यांचा हंगाम संपुष्टात आल्यानंतर आता सीताफळाचा हंगाम सुरू झाल्याने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात सीताफळ हंगामाला तुरळक प्रमाणात सुरवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी भागात सध्या तुरळक पाऊस आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात या भागातील होणारी सीताफळाची आवक कमी आहे. तर जुन्नर, आंबेगाव, खेड या भागातून जादा आवक सुरू आहे. बाजारात लहान आकाराची सीताफळ दाखल झाली असून येत्या काही आठवड्यात मोठ्या प्रमाणत सीताफळाची आवक वाढणार असल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले आहे.

यंदा गतवर्षीच्या तुलेनत सीताफळळाच्या आवकीत घट झाले असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना पडणार आहे. गेल्या महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका शेतकर्‍यांना पडला असून त्यामुळे फळ मार्केटमध्ये फळांची आवक कमी होत आहे. सध्या बाजारात इतर ही फळांची आवक घटली असून परराज्यातून येणारा माल गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे फळांच्या किमती ही वाढल्या आहेत.

- Advertisement -

किरकोळ बाजारात तर फळांचे दर दुपटीने वाढले आहेत. राज्यात आंदोलनाचे पडसाद विविध ठिकाणी उमटत असल्याने त्याचा परिणाम परराज्यातून येणार्‍या फळांच्या आवक वर झाला आहे. आंदोलना मुळे परराज्यातून होणारी आवक कमी झाली आहे. सीताफळाचा हंगाम हे पुढच्या आठवड्या पासून सुरू होणार आहे. सीताफळ हे महाराष्ट्रातून पुणे व नगर जिल्ह्यातून दाखल होत असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत या फळाचा हंगाम सुरू असतो. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सीताफळाच्या २५  ते ३० गाड्या दाखल झाल्याची नोंद होती. यंदा तुरळक पावसामुळे आवाकीत घट झाल्याचे मत घाऊक फळ व्यापारी यांनी व्यक्त केले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी भागात सध्या तुरळक पाऊस आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात या भागातील होणारी सीताफळाची आवक कमी आहे. तर जुन्नर, आंबेगाव, खेड या भागातून जादा आवक सुरू आहे. बाजारात लहान आकाराची सीताफळ दाखल झाली आहेत. मात्र आणखी आठ दिवसात सीताफळाचा हंगाम वाढून आवक ही वाढली जाणार आहे.

- Advertisement -

-संजय पानसरे , माजी संचालक तथा व्यापारी, फळ मार्केट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -