घरमुंबई११ मुलींना ब्लॅकमेल करून उकळले पैसे; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

११ मुलींना ब्लॅकमेल करून उकळले पैसे; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

‘माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन ’, असे इमोशनल ब्लॅकमेल करून महावियालयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करायचा. कॉलेजच्या आवारात अथवा वर्गातच त्या मुलीशी अश्लिल चाळे करून तिचे नग्न फोटो काढायचा.

‘माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन ’, असे इमोशनल ब्लॅकमेल करून महावियालयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करायचा. कॉलेजच्या आवारात अथवा वर्गातच त्या मुलीशी अश्लिल चाळे करून तिचे नग्न फोटो काढायचा. त्या तरुणींचे नग्न फोटो काढून ते अ‍ॅपवर टाकून खंडणी मागणार्‍या एका भामट्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्याआहेत. गौरव मोरे असे त्याचे नाव असून तो मुंबईच्या माटुंगा येथील पोद्दार कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला शनिवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. गौरव मोरे नायगावच्या बीडीडी चाळीत रहातो. तो पोद्दार कॉलेजमध्ये शिकतो. अकरावीला तो नापास झाला आहे. महाविद्यालयीन विशेषत: अकरावी, बारावीतील मुलींना तो लक्ष्य करायचा. सावज हेरून तो त्या तरुणीच्या मागे लागायचा. प्रेमाला होकार दिला नाहीस तर आत्महत्या करीन अशी धमकी द्यायचा. त्याच्या धमकीला प्रेम समजून तरुणी, त्याच्या प्रेमात पडायच्या. त्यानंतर तो त्यांच्याशी कॉलेजच्या वर्गात अश्लिल चाळे करायचा. त्या तरुणींचे नग्न फोटो काढायचा. ते फोटो अ‍ॅपवर टाकायचा. तो अ‍ॅप दाखवून तो मुलींना ब्लॅकमेल करायचा. त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून अत्याचारही करायचा.

५० हजारांची खंडणी

या नराधम गौरव मोरे आतापर्यंत ११ मुलींना अशा प्रकारे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे. गौरवच्या नराधम प्रवृत्तीला अकरावीतील एका मुलीने वाच्या फोडली. गौरव शिकतो त्याच कॉलेजमध्ये अकरावीत शिकणार्‍या एक मुलीबरोबर गौरवने असाच खेळ खेळला. तिच्याशी लगट करून तिच्यावर कॉलेजच्या आवरत अत्याचार केले. ते फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करत ५० हजार रुपयांची मागणी केली.

- Advertisement -

ठाणे पोलिसांनी पकडला

ती मुलगी ठाण्यात रहात असल्यामुळे तिने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर या लंपट पिसाट आरोपी गौरव मोरे याचा बुरखा फाटला. ठाणे खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक करून त्याच्या विरोधात खंडणी, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याला न्यायालयात नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -