घरमुंबईजुहू चौपाटीवर आढळला तरुणाचा मृतदेह

जुहू चौपाटीवर आढळला तरुणाचा मृतदेह

Subscribe

जुहू चौपाटीवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

जुहू चौपाटीवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे वय साधारण: २२ ते २४ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

असा आढळला मृतदेह

जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह त्या ठिकाणी मॉर्निंग बॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या नजरेस पडला. त्यांनी तात्काळ याबाबत सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सुरक्षारक्षकांशी पोलिसांशी संपर्क करुन याप्रकरणी माहिती त्यांना सांगितले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हा मृतदेह कुपर रुग्णालयात नेला आहे. मात्र, या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -