घरताज्या घडामोडीनाना पटोलेजी तुम्ही मला योग्य वेळी मदत करता - देवेंद्र फडणवीस

नाना पटोलेजी तुम्ही मला योग्य वेळी मदत करता – देवेंद्र फडणवीस

Subscribe

संपुर्ण प्रकरणाचा तपास मुंबई एटीएसकडे देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या मनसुख हिरेन याच्या मृत्यूनंतर आता राज्याचा विरोध पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून टीआरपी प्रकरणातील अर्णब गोस्वामीचा उल्लेख केल्यानंतर आता या प्रकरणात राजकीय वळण देऊ नये , असे आवाहन राज्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रकरणातला संपुर्ण तपास नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) कडे करण्याचे निवेदन केंद्रीय गृहमंत्र्यांना देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तर या प्रकरणातील संपुर्ण तपास आता मुंबई एटीएसला देणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ तसेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे देण्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

नाना तुम्ही मला योग्य वेळी मदत करता 

सचिन वाझे कोण आहे? आम्ही तो काळा की गोरा ? हे पाहिले. त्याने किती माणसे ठोकली ? किती जणांना मारल हे आम्हाला माहितही नाही. जो सगळ्यात मुख्य साक्षीदार आहे, त्याचे संरक्षण आपण करू शकलो नाही. या प्रकरणात आम्ही केंद्र सरकारला सांगू की या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयएची) नेमणुक करावी. नाना पटोलेजी बर झाले तुम्ही मला आठवण करून दिली असे सांगत त्यांनी या प्रकरणात केंद्राची मदत घेणार असल्याचे यावेळी सांगितले. तुम्ही माझे मित्रच आहात, तुम्ही योग्य वेळी मदत करता असा चिमटाही देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसच्या नाना पटोले यांना काढला. निश्चितच आम्ही केंद्रीय गृहमंत्री मंत्र्यांना निवेदन देऊ असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. हे प्रकरण चौकशीसाठी थेट घ्यावे, अशीही विनंती करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय संस्था असो किंवा राज्याच्या संस्था असो, केंद्राची ईडी,सीबीआय, एनआयए, एनसीबी असो त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. केंद्रासारख्याच राज्यातील एटीएससारख्या संस्थांचाही आम्हाला अभिमान आहे. कोणत्याही संस्थेसाठी अनादर जाहीर करत नाही. सुशांत सिंह प्रकरणात लॉकडाऊनमध्ये चर्चा झाली. ही चर्चा सीबीआयला गेली. सीबीआयने सहा महिन्यात वारंवार विचारूनही सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात काय केले असे सांगावे. त्यामुळे सीबीआयवर अविश्वास नाही असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. त्यामुळे सभागृहातील विरोधी पक्षनेते, आमदारांना विनंती करतो की त्यांच्याकडे जी काही कागदपत्रे आहेत ती सादर करावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रकरणातील काही कागद असतील, पुरावे असतील त्याची आम्हाला मदतच होणार आहे असे देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. याच पोलिसांनी गॅंगवार संपवले, दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या. आपल्या मुंबई शहरातील शूटआऊट कोणी बंद केले ? फिल्मस्टार आणि बिल्डर लॉबीला धमक्या येत होत्या क्या कोणी बंद केल्या, तर त्या मुंबई पोलिसांनी केला. त्यामुळेच या पोलिसांवर विश्वास ठेवा असे अनिल देशमुख सभागृहात म्हणाले. या प्रकरणातील संपुर्ण तपास आता मुंबई एटीएसला देणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ तसेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे देण्याची माहिती त्यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांना दिली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -