घरताज्या घडामोडीCBSE बोर्डच्या १० वी १२ वीच्या वेळापत्रकांत मोठा बदल

CBSE बोर्डच्या १० वी १२ वीच्या वेळापत्रकांत मोठा बदल

Subscribe

कोरोनामुळे अनेक शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यात आल्या तर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे सीबीएसईच्याही १० वी १२ वी बोर्डच्या परीक्षा होणार की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी होते. यानंतर काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाने १० वी १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र या वेळापत्रकात (CBSE revised date sheet) CBSE ने अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आधी जाहीर झालेल्या १० वी १२ वीच्या काही विषयांच्या तारखांमध्येही मोठे बदल झाले आहेत. CBSE बोर्डाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या १२ वीच्या वेळापत्रकाप्रमाणे, १२ वीचा फिजिक्स विषयाची १३ मे रोजी होणारी परीक्षा आता ८ जूनला होणार आहे. तर गणित विषयाची परीक्षा १ जून ऐवजी ३१ मेला घेतली जाणार आहे. तसेच Web Application ची परीक्षा ३ जूनला होणारी परीक्षा २ जूनला घेतली जाईल. त्याचप्रमाणे भूगोल विषयाची २ जूनला होणारी परीक्षा ३ जूनला येणार आहे.

CBSE बोर्डाने १० वीच्या नव्या वेळापत्रकाप्रमाणे, आता 10 वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची परीक्षा 21 मेच्या जागी 2 जून रोजी होईल. तर Frenchची 13 मे रोजी होणारी परीक्षा आता 12 मे रोजी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे विज्ञान विषयाची परीक्षा 15 मे ऐवजी 21 मे रोजी होणार तर संस्कृत विषयाची 2 जून रोजी होणारी परीक्षा 3 जून रोजी घेण्यात येईल. CBSE बोर्डाने १० वी १२ वीचे नवे वेळापत्रक (CBSE revised Date sheet) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलं आहे. या संकेत स्थळावरू विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

- Advertisement -

CBSE बोर्डाची अधिकृत लिंक 

https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html

हेही वाचा- अंबानी स्फोटक प्रकरण: स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -