घरमुंबईDevendra Fadnavis : मुंबई पालिकेची निवडणूक ठाकरेंमुळे रखडली: देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Devendra Fadnavis : मुंबई पालिकेची निवडणूक ठाकरेंमुळे रखडली: देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Subscribe

मुंबईः मुंबई महापालिकेची निवडणूक आमच्यामुळे नाही तर ठाकरे गटामुळे रखडली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.

पालिकेविषयी ठाकरे गटाने न्यायालयात याचिका केल्या आहेत. एक याचिका तर आरक्षणाची आहे. या सर्व याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच पालिकेची निवडणूक रखडली आहे. असे असूनही ठाकरे गट आमच्यावर आरोप करतो की आम्ही पालिकेच्या निवडणुका रखडवल्या. पण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत न्यायालय निवडणुकीचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचाःइसिसच्या चार संशयित तरुणांना अटक; मुंबईसह ठाणे, पुण्यात NIA कारवाई

तलावांत चांगला पाऊस; 10 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात मागील काही दिवसांत मोठी घट झाल्याने मुंबई महापालिकेने मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर दुसरीकडे सध्या तलावांत समाधानकारक नसला तरी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सात तलावांत मिळून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २,४२,८६१ दशलक्ष लिटर इतका म्हणजे (दररोज ३,८५० दशलक्ष लिटर प्रमाणे) पुढील ६३ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू असल्याने दररोज ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याने त्यानुसार सदर पाणीसाठा हा पुढील ७० दिवस म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून ते पुढील वर्षभरासाठी मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र यंदा पावसाचे आगमन २४ जून रोजी उशिराने झाले. त्यातही अपेक्षित पाऊस पडत नव्ह्ता. परिणामी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ होत नव्हती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -