घरताज्या घडामोडीफोटो : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

फोटो : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Subscribe

अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधीवत पुजा- अर्चना उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरुप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते. गणेशाच्या या रुपाला ‘संकटमोचन गणेश’ असे म्हटले जाते. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल असे वरदान दिले. त्यादिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -