घरCORONA UPDATEधारवाड मेडिकल कॉलेजमधील २८१ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; Omicron विषाणूमुळे घेतली जातेय खबरदारी

धारवाड मेडिकल कॉलेजमधील २८१ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; Omicron विषाणूमुळे घेतली जातेय खबरदारी

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी धारवाड मेडिकल कॉलेजमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २८१ वर पोहचली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार लक्षात घेता काही खबरदारीचे उपाय करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळत असलेल्या काही देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने आधीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामागे विषाणूचा प्रसार रोखणे हा उद्देश आहे. बोम्मई म्हणाले, “धारवाड, बेंगळुरू आणि बेंगळुरू ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये कोविडचा प्रसार वाढत असून शेजारच्या केरळ राज्यांमध्येही कोरोनाची प्रकरणे वाढ आहेत.

- Advertisement -

यामुळे कर्नाटकात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढू नये किंवा रुग्ण सापडू नये यासाठी तातडीने खबरदारीची पावले उचलण्याचा निर्णय घेत आहोत. यासाठी आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोविड सल्लागार आणि तज्ञांची बैठक बोलावली आहे. यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर चर्चा केली जाणार आहे अशी माहिती बोम्मई यांनी दिली.

“केवळ वैद्यकीय खबरदारीच नाही, सार्वजनिक ठिकाणीही महत्त्वाची पावले तातडीने उचलली जातील.”

- Advertisement -

धारवाडच्या एसडीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बाधितांची संख्या २८१ वर पोहोचली आहे. बहुतेक संक्रमितांमध्ये लक्षणे दिसून आली नाहीत तर काहींना सौम्य लक्षणे दिसली आहेत. या सर्वांना आत्ता क्वारंटाईन करण्याच आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धारवाड जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या ५०० मीटर परिसरात असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, तर ओपीडी सेवाही तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -