घरमुंबईदूध वाहू नका, गरिबांना वाटा

दूध वाहू नका, गरिबांना वाटा

Subscribe

कल्याण-डोंबिवलीच्या पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती. गेल्या आठ वर्षांपासून दुधाचा अभिषेक बंद करण्यात आला असून दूध गरिबांना वाटा या आवाहनाला कालच्या शिवरात्रीला भाविकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पिंडीवरील दूध गरिबांना वाटण्याच्या या मोहिमेची एकच चर्चा खिडकाळेश्वर मंदिर परिसरात होती.

कल्याण शीळ रस्त्यावरील खिडकाळी गावात पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर हे खिडकाळेश्वरचे प्रसिध्द मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे आदी परिसरातून दर्शनासाठी येतात. गेल्या ८ वर्षांपासून या मंदिरातील पिंडीवरील दुधाचा अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.‘दूध वाहू नका, गरिबांना वाटा ’ या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद दिला. पूजेसाठी फक्त फुले वाहावीत, या आवाहनालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मंदिरात दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपासून मोठी रांग लागली होती. महाशिवरात्रीनिमित्ताने याठिकाणी जत्रेचे स्वरूप येते.

- Advertisement -

यावर्षी मंदिरात रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयेाजन करण्यात आले होते. शीळ रस्त्यावरील मानपाडेश्वर, पिंपळेश्वर मंदिर, आयरे गाव येथील नवनाथ नागेश्वर मंदिर, अनमोल नगरी येथील नागेश्वर मंदिर तसेच उमेशनगर परिसरातील शिवमंदिर तसेच शहरातील सर्वच शिवमंदिरे रोषणाईने रंगेबेरंगी पताके यांनी झळकली हेाती. महाशिवरात्रीनमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांची दर्शनासाठी लांबच लांब रांग असल्याने मंडप उभारण्यात आला होता. कल्याण डोंबिवली परिसरातील लाखो भाविकांनी दर्शन घेते. यावेळी भजन कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. शहरातील मोठ्या शिवमंदिरात पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात महाशिवरात्री उत्सव पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -