घरमुंबईतुम्हालाही स्मार्टफोनचे व्यसन म्हणजे नोमोफोबिया आहे का?

तुम्हालाही स्मार्टफोनचे व्यसन म्हणजे नोमोफोबिया आहे का?

Subscribe

मोबाईलशिवाय आपण जगू शकत नाही. मोबाईल बसल्या बसल्या इकडे तिकडे हरवला, तर तुम्ही अस्वस्थ होता. बराच वेळ मोबाईल दिसला नाही, तर देखील तुम्ही अस्वस्थ होतात आणि ऑफिस किंवा मार्केटला येताना मोबाईल घरीच ठेवला देखील तुम्हाला अपूर्ण असल्याचे जाणवते.

मोबाईलच्या या व्यसनाला ‘नोमोफोबिया’ म्हणजे ‘नो मोबाईल फोबिया’ अर्थात मोबाईल नसण्याची भीती. पण, ही समस्या मानसिक विकार आहे की नाही. हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पण, हे मोबाईलचे एक व्यसना आहे. यामुळे पीडित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हळूहळू त्याचा परिणाम नातेसंबंधांवरही होऊ लागतो.

- Advertisement -

अहवालानुसार, भारतातील 4 पैकी 3 लोकांना काही प्रमाणात नोमोफोबियाचा त्रास होतो. त्यातील काहींनी इंटरनेट बिघडणे, मोबाईल हरवणे, बॅटरी संपणे आदींमुळे भावनिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मान्य केले.

- Advertisement -

अशी ओळखा फोबियाची लक्षणे

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे त्याचा मोबाईल नसतो आणि तो वारू शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीमध्ये भिती, चिंता आणि अस्वस्थतेची भावना दिसून येते. तो व्यक्ती मोबाईल वापरू न शकल्याने तो चिंतीत असतो.
  • यामुळे लोक मोबाईल स्विच ऑफ करायला घाबरतात
  • सतत मोबाईल पाहातात की, कोणी कॉल, मॅसेज आणि नोटिफिकेशन तर नाही आले ना.
  • जिथे जातील तिथे मोबाईल घेऊन जातात. मोबाईल जवळ असल्याचे सतत पाहात राहतात.
  • इंटरनेट व्यवस्थित काम करत नसेल, तर ते चिडचिड करू लागतात.

स्वत:ची मदत हाच उपचार

  • तुम्ही मोबाईलवर जास्त वेळ घालवत असल्याचे तुमच्या लक्षात येत असेल, तर तुम्ही मोबाईलचा योग्य वापराकडे लक्ष द्या. यासाठी तुम्ही सर्व प्रथम मोबाईलला काही ठराविक वेळेसाठी स्वत:पासून लांब ठेवा.
  • झोपणे, जेवण तयार करणे किंवा खाणे यासारख्या दैनंदिन कामांमध्ये मोबाईलचा वापर करू नका. कौटुंबिक किंवा कामाच्या वेळी आवश्यक असेल. तेव्हाच तुम्ही मोबाईलचा वापर करा. अशाप्रकारे, तुम्ही मर्यादित, संतुलित आणि योग्य वापर करून वाचवलेल्या वेळेचा वापर लोकांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी करा.
  • तुम्ही मोबाईलमध्ये जास्त लक्ष देत असला तर, मोबाईलचे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही सुकाळ-सांध्याकाळी चालायला जा. पुस्तके वाचा, खेळ खेळा, नृत्यू करा, गाणी ऐका, अ सवयी करा. परिसंवाद करण्यासाठी काही लोकांना एकत्र आणा. दररोज चांगल्या विषयावर लोकांशी चर्चा करा.
  • मोबाईलमधील नोटिफिकेशन चालू ठेवू नका. मोबाईलचा वापर हा फक्त कामासाठी करतात.

असा करा उपचार

नोमोफोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीवर मनोचिकित्सा आणि मेंदूवर परिणाम करणारी औषधे या दोन्हींद्वारे उपचार केले जाऊ शकतात. या समस्येच्या निदानासाठी संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी पद्धत अधिक प्रचलित आहे. या प्रणाली अंतर्गत, मनोचिकित्सक रुग्णाच्या नकारात्मक आणि तर्कहीन विचारांच्या पद्धतीचे विश्लेषण करतो. ज्यामुळे त्याचे वर्तन दुर्भावनापूर्ण किंवा असामान्य बनले आहे. तो रुग्णाच्या विचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ओळखतो. याशिवाय नैराश्यग्रस्त रुग्ण डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर चिंताविरोधी आणि भीतीविरोधी औषधे वापरू शकतात.


हेही वाचा – वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल Ginger पावडर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -