घरताज्या घडामोडीभायखळा रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

भायखळा रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) येथून आसनगांवच्या दिशेने जाणाऱ्या गाडीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमधील बिघाडामुळे इतर लोकल एकामागोमाग एक उभ्या आहेत. परिणामी, प्रवाशांचा मनस्ताप होत आहे. (Due to technical fault Central Railway Local Issue passengers)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातीस धीम्या मार्गावर हा बिघाड झाला. त्यामुळे लोकल वाहतूक मागील दीड पाऊण तासांपासून ठप्प आहे. परिणामी धीम्या लोकल जलद मार्गावरून सोडण्यात येत आहेत.

- Advertisement -

ओव्हरहेड वायरमधील या बिघाडाची माहिती मिळताच घटनास्थळी मध्य रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. याशिवाय, भायखळा चिंचपोकळी आणि करिरोड स्थानकात लोकल गाड्या एकामागोमाग एक उभ्या आहेत.

गेल्या पाऊण तासापूर्वी विस्कळीत झालेली लोकल सेवा अद्याप पूर्वरत न झाल्याने प्रवाशांचा खोळांबा होत आहे. लोकल उशिराने धावत असल्याने सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी आणि करीरोड स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येत असल्याने इतर लोकली काही काळासाठी थांबवल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बिघाड होत आहे. शिवाय लोकलच्या लेटमार्कमुळे प्रवाशांनाही निश्चित स्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेचे कर्मचारी हा बिघाड दुरूस्त करत आहेत. मात्र या बिघाड दुरूस्त होऊन लोकल सुरळीत कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


हेही वाचा – मातोश्रीवरील आरोपांनंतर शिंदे गटाला केंद्राचे गिफ्ट; प्रताप जाधवांवर मोठी जबाबदारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -