Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'आदिपुरुष' चित्रपटाला राजकीय वर्तुळातूनही विरोध; राम कदमांनी ट्विट करत दिला इशारा

‘आदिपुरुष’ चित्रपटाला राजकीय वर्तुळातूनही विरोध; राम कदमांनी ट्विट करत दिला इशारा

Subscribe

या चित्रपटाच्या व्हीएफएक्स वरूनही या चित्रपटावर नेटकऱ्यांकडून टीका करण्यात येत आहे. या चित्रपटाला विरोध होत असतानाच आता राजकीय नेत्यांकडून या चित्रपटाला विरोध दर्शविला जात आहे.

सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यानेच याही चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान ता दोघांही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला ट्रॉल केलं जात आहे. या चित्रपटाच्या लुक बद्दलही खूप खिल्ली उडविली जात आहे. तर या चित्रपटाच्या व्हीएफएक्स वरूनही या चित्रपटावर नेटकऱ्यांकडून टीका करण्यात येत आहे. या चित्रपटाला विरोध होत असतानाच आता राजकीय नेत्यांकडून या चित्रपटाला विरोध दर्शविला जात आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी सुद्धा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला विरोध केला आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराच राम कदम यांनी दिला आहे.

हे ही वाचा – मला महाभारतातही काम करायला आवडेल…’आदिपुरुष’च्या वादानंतर सैफ अली खानची प्रतिक्रिया

- Advertisement -

दरम्यान या संदर्भांत राम कदम यांनी दोन ट्विट करून चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. “आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एकदा किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… देवीदेवतांची आक्षेपार्ह चित्रण केल्याने त्यांना माफी मागावी लागेल.” असे राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

राम कदम यांनी याच संदर्भात आणखी एक ट्विट करत म्हटले आहे, “दृश्यांची काटछाट करून चालणार नाही. अशी घाणेरडी विचारधारणा असलेल्या लोकांना धडा शिकवायला हवा. अशाप्रकारच्या कोणत्याही चित्रपटावर कायमची बंदी किंवा संबंधित लोकांनी इंडस्ट्रीत काम करण्यावर काही वर्ष बंदी घालण्यात यावी. म्हणजेच भविष्यात असं कारण्याची हिंमत करणार नाही. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.”

‘आदिपुरुष’ हा चित्रपट 5 भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा रामायणावर आधिरीत असून या चित्रपाचे बजेट 500 कोटी असल्याचे बोलले जात आहे. 12 जानेवारी 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटावर चांगल्या वाईट अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर काहींनी हा चित्रपट बॉयकॉट कर्णयःची मागणी सुद्धा केली आहे.

हे ही वाचा –  दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभास करणार रावण दहन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -