घरमुंबईनिविदा त्रुटींमुळे रुग्णालयाचे नूतनीकरण रखडले

निविदा त्रुटींमुळे रुग्णालयाचे नूतनीकरण रखडले

Subscribe

मुलुंडमधील एम.टी. अगरवाल या रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी मागील अनेक वर्षांपासून पालिका काढत असलेल्या निविदांमध्ये त्रुटी असल्याने रुग्णालयाचे नूतनीकरण रखडले आहे. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून तेथे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मात्र पालिकेकडून चुकीच्या निविदा काढण्यात येत असल्याने ही कामे अनेक वर्षांपासून रखडली असल्याची आरोप स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे. तसेच या रुग्णालाचे नूतनीकरण लवकर करावी अशी मागणी त्यांनी केली.

तीनशे कोटींचा निधी केला होता मंजूर 

- Advertisement -

पालिकेच्या एम. टी. अगरवाल या रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय बांधण्यासाठी स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी पाच वर्षांपूर्वी पालिकेकडे मागणी केली होती. पालिकेने तीन वर्षांपूर्वी ही मागणी मान्य करून 300 कोटींचा निधी मंजूरही केला. त्यानंतर या रुग्णालयासाठी पालिकेच्या इंजिनियर विभागाकडून निविदा काढण्यात आल्या. मात्र या निविदा 30 ते 40 टक्के अधिक दराने असल्याने त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता पुन्हा या रुग्णालयासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र त्या निविदाही जुन्या दरावर काढण्यात आल्याने त्यांचा दर यावर्षीच्या दरापेक्षा अधिक होता. त्यामुळे यावेळीही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही.

मोठ्या प्रामाणात रुग्णांचे हाल

- Advertisement -

पालिकेकडून चुकीच्या पद्धतीने निविदा काढण्यात येत असल्याने रुग्णालयाचे नूतनीकरण रखडले असून, मुलुंडमधील या रुग्णालयात मुलूंडसह ठाणे, भांडुप, नाहूर या परिसरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णाचे हे हाल रोखण्यासाठी पालिकेने तातडीने पुढाकार घेऊन योग्य निविदा काढाव्यात अशी मागणी स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली.

असे असेल रुग्णालय

एम. टी अगरवाल रुग्णालयाची 10 मजली सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये 428 खाटा, 17 शस्त्रक्रिया गृह, अत्याधुनिक रक्तपेढी, डायलिसिस केंद्र, आयसीयू विभाग, आयसीसीयू विभाग, शवविच्छेदन विभाग अशा विविध सोईसुविधा असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -