घरताज्या घडामोडीलॉकडाऊन दरम्यान 'या' महिलेच्या प्रसुतीसाठी शेजारी आले धावून!

लॉकडाऊन दरम्यान ‘या’ महिलेच्या प्रसुतीसाठी शेजारी आले धावून!

Subscribe
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एका महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. अशा वेळी शेजारची महिला तिच्यासाठी धावून आली आणि तिची प्रसुती सुखरूप झाली. ठाण्यातील सोनोने आणि येवरूणकर हे दोन्ही कुटूंब त्या महिलेच्या मदतीला धावून गेले आणि तिच्यासाठी ते देवदूतच ठरले. कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात माणुसकी जपणारी ही घटना बुधवारी ठाण्यात घडली आहे.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्रसुतीच्या वेदना सुरू

कोरोनामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रत्येकजण सामाजिक अंतर ठेवूनच वावरत आहे. पण अशा अवस्थेतही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ठाण्यातील दोन महिला धावून आल्या आहेत. ठाण्यातील मानपाडा गणेशनगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एका गर्भवती महिलेला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. घरची परिस्थिती बेताची आणि त्यात लॉकडाऊन. अशा परिस्थितीत तिच्या पतीचेही अवसान गळाले. एवढया रात्री करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या मंजू येवरूणकर आणि राजू येवरूणकर हे दाम्पत्य तिच्या मदतीला धावून गेले.

एकिकडे त्या महिलेला प्रसुतीच्या वेदना असहय झाल्या होत्या तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे वाहने मिळणे मुश्किल होत, त्यामुळे सगळयांची चिंता वाढली होती. अखेर मंजू येवरूणकर यांनी ठाणे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनोने यांना फोन केला. त्यांना परिस्थितीची माहिती दिल्यानंतर त्या स्वत: मुलगी डॉ स्नेहा सोनोने हिच्या समवेत त्या महिलेच्या घरी पोहचल्या. ती गर्भवती महिला गंभीर परिस्थितीत होती. त्यावेळी अत्यावश्यक सेवा १००, १०८, १०२, १०४ यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सोनाने यांनी स्वत:च्या वाहनातून त्या महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात नेले, डॉक्टरांनी तातडीने त्या महिलेची तपासणी केली, तिची अवस्था खूपच गंभीर होती. बाळाच्या ह्दयाच्या ठोके जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. अखेर मध्यरात्री दोन वाजता तिची प्रसुती सुखरूप झाली. बाळ- बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. त्या मातेनेही येवरूणकर आणि सोनोने कुटूंबियांचे आभार मानले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -