घरमुंबई'आता चौकशीची गरज नाही'; ईडीचं शरद पवारांना पत्र

‘आता चौकशीची गरज नाही’; ईडीचं शरद पवारांना पत्र

Subscribe

'तुर्तास शरद पवारांच्या चौकशीची गरज नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीकडून शरद पवार यांना एक ईमेल पाठवण्यात आला आहे. सध्या कोणत्याही चौकशीची गरज नसल्याचे या मेलद्वारे पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही चौकशीची गरज नसल्याचे ईडीने म्हटल्याचे समोर आले आहे. गुरुवारी शरद पवार यांच्या वकीलाने केलेल्या ईमेलवर ईडीने प्रतिक्रिया दिली असून तरी देखील पवार ईडीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ते अधिकाऱ्यांचे म्हणणं ऐकून घेतील आणि ईडीच्या वतीने त्यांच्या ईमेलला दिलेला प्रतिक्रिया देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

ईडीमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडी मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. यासर्व परिस्थितीमुळे मुंबईमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

असं म्हटलंय ईडीने पत्रात

शरद पवारांच्या चौकशीची गरज नसल्याचे या पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच भविष्यातही कदाचित शरद पवारांच्या चौकशीची गरज भासणार नाही. गरज भासल्यास बोलवले जाईल, असेही ईडीने या पत्रातून स्पष्ट केले आहे. शरद पवारांनी ईडीला दिलेल्या पत्राला हे उत्तर मिळाले आहे. यामुळे आता शरद पवार हे २ वाजता ईडी कार्यालयात जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याकरिता पाठवले ईडीने पत्र

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत ते २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. आज ते ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहणार असल्याने या पार्श्वभूमीवर ईडीने शरद पवारांना हे पत्र पाठविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -