घरमुंबईतर सोनिया, राहुलनेही निवडणूक लढू नये- विनोद तावडे

तर सोनिया, राहुलनेही निवडणूक लढू नये- विनोद तावडे

Subscribe

भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेस पक्षावर तसेच काँग्रेसचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्यावरही टीकांचा भडीमार केला आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज १९ एप्रिल रोजी भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेस पक्षावर टीकांचा भडीमार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकावर सुटाबुटातील सरकार, असे आरोप करणाऱ्या काँग्रेसचे खरे रुप आता समोर आले आहे. अंबानी, कोटक यांच्या सारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस पक्ष चालत असल्याचे आता स्पष्ट झाल्याची जोरदार टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज रोजी केला. दक्षिण मुंबई लोकसभा मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनीच उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक यांनी पाठिंबा दिल्याचे जाहिर केले आहे, पण त्यांचे नेते राहुल गांधी म्हणतात की, मोदी सरकार हे अंबानी, अदानी यांचे सरकार आहे. मग राहुल गांधी म्हणतात ते खरे की, मिलिंद देवरा यांच्या सीडी, कॅसेटवर जे दिसतय ते खरे, असा सवालही तावडे यांनी केला आहे. पण यामुळे भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य, गरीब, आदिवासी, मागास, कामगार, मध्यमवर्गीय लोकांच्या ताकदीवर चालणारा पक्ष आहे हे यातून सिध्द झाले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यांनी सुद्धा निवडणूक लढवू नये

‘साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढवू नये कारण त्यांच्या विरुध्द आरोप असून त्या जामिनावर बाहेर आहेत’, अशी टीका करणाऱ्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सुध्दा जामीनावर बाहेर आहेत, हे ध्यानात ठेवावे. कारण त्यांच्याविरुध्दही आरोप आहेत मग त्यांनी का निवडणूक लढवाव्यात आणि जर जामीनावर असताना निवडणुक लढवायची नसेल तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सुध्दा निवडणुक लढवु शकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

शरद पवारांवरसुद्धा केली टीका

मोदी सरकार भुलथापा मारुन सत्तेत आले आहे, अशी टीका करणाऱ्या शरद पवार यांच्या विधानाबद्दल बोलताना तावडे यांनी सांगतिले की, शरद पवार यांनी भूलथापा तुम्ही म्हणावे हे आर्श्चयच आहे. तसेच गांधी घराण्याचा त्याग तुम्हाला आता आठवतोय, पण जेव्हा तुम्ही दोन वेळा काँग्रेस पक्ष सोडला, त्यावेळी तुम्ही गांधी घराण्यासंदर्भात काय काय म्हणाला होतात ते आठवून बघा. आज निवडणुकीत विरोधकांची फाटाफुट झाल्यामुळे आपल्या मनात नसताना ओठातून एक बोलणे शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांना शोभत नाही, असा टोलाही त्यांनी मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -