घरमुंबईशिवसेनेची, भाजपला की मनसेला मदत?

शिवसेनेची, भाजपला की मनसेला मदत?

Subscribe

परिवहन समिती निवडणूक

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या सहा सदस्यपदाची निवडणूक येत्या 15 फेब्रुवारी रोजी होत आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेकडे अतिरिक्त मते असल्याने ते युतीचा धर्म पाळून भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकतात की मनसे उमेदवाराला साथ देत ठाकरे बंधूचे, ‘तुझ्या गळ्या, माझ्या गळ्या’चे समीकरण घडते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

परिवहन समिती सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुनील खारूक, अनिल पिंगळे आणि बंडू पाटील तर भाजपकडून संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर आणि मनसेचे मिलींद म्हात्रे हे सात उमेदवारी निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचे संख्याबळानुसार तीन सदस्य सहजपणे निवडून जात आहेत, तर भाजपच्या संख्याबळानुसार दोन सदस्य निवडून जात आहेत. तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. येऊ घातलेल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करण्यावरून शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चांगलीच तणातणी सुरू आहे.

- Advertisement -

त्यामुळे त्याचे पडसाद परिवहन सदस्य निवडणुकीत पडणार का ? असाही प्रश्न आहे, तसेच यापूर्वी झालेल्या अनेक समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व मनसेचे मनोमिलन झाल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळे आपल्या अतिरिक्त मतांचे दान शिवसेना मनसे उमेदवाराच्या पारड्यात टाकते का, असाही प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेचे अतिरिक्त मतांचे दान भाजपच्या की मनसे उमेदवाराच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मनसे आणि राष्ट्रवादीच्या युतीची बोलणी सुरू आहे. त्यामुळे परिवहन निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मते मनसे उमेदवाराच्या पारड्यात पडतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -