घरमुंबईअकरावीची विशेष फेरीचे प्रवेश स्थगित; एसईबीसी विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्यासाठी मुदतवाढ

अकरावीची विशेष फेरीचे प्रवेश स्थगित; एसईबीसी विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्यासाठी मुदतवाढ

Subscribe

अकरावी प्रवेशाची विशेष फेरीची जाहीर होणार्‍या गुणवत्ता यादीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना आता ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये समावेश करण्याचा सरकारने बुधवारी निर्णय घेतला. त्यापार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाची विशेष फेरीची जाहीर होणार्‍या गुणवत्ता यादीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना आता ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली असून, प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गातून अर्ज भरता यावे यासाठी विशेष फेरीला स्थगिती देत ती पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता विशेष फेरीची गुणवत्ता यादी २८ डिसेंबरला प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश घेतले आहेत, मात्र रद्द करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना या फेरीत आपले प्रवेश रद्द करता येणार आहेत. तसेच लगेचच विशेष फेरीसाठी अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

मुंबई विभागात अकरावीच्या एकूण ३ लाख २० हजार ३९० जागा आहेत. तिसर्‍या प्रवेश फेरीअंती केवळ १ लाख ३५ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे विशेष फेरीसाठी तब्बल १ लाख ४८ हजार ३८६ जागा रिक्त आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -