घरमुंबईराज्यातील शिक्षकांना दिलासा; सरकार देणार अनुदान

राज्यातील शिक्षकांना दिलासा; सरकार देणार अनुदान

Subscribe

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरीषदेत केलेल्या उपरोक्त घोषणेचा लाभ राज्यातील सुमारे ३० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, बुधवारी विधानपरीषदेत केलेल्या उपरोक्त घोषणेचा लाभ राज्यातील सुमारे ३० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये उपरोक्त बाबींची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही विनोद तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले. तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील १५ दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरीता सादर करण्याची देखील घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक आज विधानभवनात पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. यावेळी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी शिक्षकांची वास्तव बाजू बैठकीत मांडली.

- Advertisement -
  • अघोषित प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या आणि कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा/घोषित उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या

१२७९ शाळा

१८६७ तुकड्या

- Advertisement -

९,९०१ शिक्षक

४११ शिक्षकेत्तर

११ अर्धवेळ शिक्षक

  • १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये २० टक्के अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील २० टक्के अनुदान देणेबाबत

१६२८ शाळा

२४५२ तुकड्या

१४, ३६३ शिक्षक

४८८४ शिक्षकेत्तर

  • उपरोक्त सर्व बाबींकरीता अंदाजे येणारा खर्च – रु. २७५ कोटी पर्यंत

२९०७ शाळा,

४३१९ तुकड्या

२३८०७ शिक्षक

५३५२ शिक्षकेत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -