घरमुंबई'ईएसआयसी' रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणातील दोषींकडे दुर्लक्ष

‘ईएसआयसी’ रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणातील दोषींकडे दुर्लक्ष

Subscribe

'ईएसआयसी' कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यास प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. आगीच्या धुरामुळे गुदमरून १३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

अंधेरी एमआयडीसी येथील ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यास प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड(एनबीसीसी) च्या डॉ.अनूप कुमार मित्तल,अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक(एनबीसीसी) आणि आलोक रंजन,मुख्य सरव्यवस्थापक(एनबीसीसी) यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही मनसे कडून करण्यात आली आहे. त्यानुसार, ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयास लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

१३ जणांचा दुर्देवी मृत्यू

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात १७ तारखेला ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयाला भीषण आग लागली होती. आगीच्या धुरामुळे गुदमरून १३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश होता. तर, १४७ जणांना रुग्णालयातून सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. यापैकी १०६ जखमींना मुंबईतील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

नव्या इमारतीचे काम सुरू

१९७० साली ३५० खाटांचे रुग्णालय कामगारांसाठी बांधण्यात आले. २००८ पर्यंत ते राज्य सरकारच्या अखत्यारित होते. त्यानंतर ते केंद्राने ताब्यात घेतले. दहा वर्षांपासून येथे ५०० खाटांच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. या बांधकामाची सर्व जबाबदारी ही दिल्लीच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची (एनबीसीसी) आहे. पण, हे काम दहा वर्षे उलटूनही आजपर्यंत पूर्ण झाले नव्हते ही बाब अत्यंत गंभीर आहे. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी)कंपनीच्या बेजबाबदारपणामुळेच ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयात भीषण आग लागली. ज्यात १३ निष्पाप नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -