घरमुंबईPolitics : 'वर्षा'वरील राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर; काँग्रेसकडून कारवाईची मागणी

Politics : ‘वर्षा’वरील राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर; काँग्रेसकडून कारवाईची मागणी

Subscribe

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज दिली.

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज दिली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर आता तरी निवडणूक आयोग डोळ्यावरील पट्टी काढून कारवाई करील का असा सवालही त्यांनी केला. (Evidence of political meeting on CM Eknath Shinde Varsha bunglow submitted to Election Commission)

वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकांची तक्रार सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. सचिन सावंत यांनी या बैठकीच्या संदर्भातील पुरावे निवडणूक आयोगाला आज सादर केले. यासंदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, 24 व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह आणि माध्यमांमधून छापून आलेल्या बातम्यांची प्रत निवडणूक आयोगाला सादर केली आहे. विरोधी पक्षांवर ज्या तत्परतेने कारवाई केली जाते, तेवढी तत्परता सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत आयोग दाखवताना दिसत नाही. वर्षावरील बैठकांचा पुरावा सादर केल्यानंतर तरी निवडणूक आयोग कारवाई होईल.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : देशात पहिले कमळ फुलले, सुरतमध्ये भाजपाच्या मुकेश दलालांची बिनविरोध निवड

- Advertisement -

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे श्रीरामाचे मोठे फलक लावून मते मागत आहेत. पश्चिम उपनगरातील मोगरा मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक मोठा  फलक असून त्यात प्रभू रामाचे चित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे’ असा मजकूर आहे. हा फलक म्हणजे सरळ सरळ आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कितीही येऊदेत अडथळे आता माघार नाही…; महाविकास आघाडी-भाजपला आव्हान देणारे विशाल पाटील कोण?

लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 123 आणि उपकलम 3 चे हे उल्लंघन आहे. शिवसेनेच्या प्रचार गीतामध्ये ‘भवानी’ शब्द आहे तो काढा अशी नोटीस निवडणूक आयोग पाठवतो. परंतु सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तक्रार केल्यावर निवडणूक आयोग त्यावर कारवाई करत नाही, अशी खंतही सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -