घरमुंबई'मनसे' खिल्ली, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा; १५१ रुपये मिळवा

‘मनसे’ खिल्ली, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा; १५१ रुपये मिळवा

Subscribe

पंढरपूर येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. मात्र या भाषणाची मनसेने चांगलीच खिल्ली उडवली आहे.

राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी अयोध्या दौरा केला होता. मात्र तेथे त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर काल (२४ डिसेंबर) त्यांनी पंढरपूर येथे जाऊन जाहीर सभा घेत या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. मात्र उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे केलेल्या भाषणाची मनसेने चांगलीच खिल्ली उडवली आहे. “उद्धव ठाकरे यांचे भाषण ज्यांना कळले असेल त्यांनी या भाषणाचा अर्थ समजावून सांगावा, ज्याला हे भाषण कळले त्याला मनसेकडून १५१ रुपयांचे बक्षीस देण्यात येईल”, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केले आहे.

विश्लेषण करा, १५१ रु. मिळवा – संदिप देशपांडे

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे म्हणाले की, “उद्धव ठाकरे काय बोलतायत याचा काहीच मेळ लागत नाही. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले की आम्ही २५ वर्ष युतीत सडलो. आता ते म्हणतायत की युतीचा निर्णय जनताच घेईल.” उद्धव ठाकरे यांचे पंढरपूरातील भाषण अनाकलनीय आहे. त्यामुळे जो कोणी या भाषणाचे अचूक विश्लेषण करेल त्याला आमच्याकडून १५१ रुपयांचे बक्षीस देऊ, असे देशपांडे म्हणाले आहेत.

- Advertisement -

झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी पंढरपूर दौरा

झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी मी अयोध्या दौरा केला असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या भाजपला लक्ष्य केले. “झोपलेल्या कुंभकर्णा जागा हो, नाहीतर हिंदू तुम्हाला तुमची जागा दाखवेल” असे देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. तसेच युतीबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. जो निर्णय घ्यायचा तो जनता घेईल असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.


हे वाचा – उद्धव ठाकरेंची पंढरपूरवारी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -