घरमुंबईभिवंडीतील पंडित चौघुले बी-फार्मसी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

भिवंडीतील पंडित चौघुले बी-फार्मसी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

Subscribe

भिवंडीतील साई सेवा शिक्षण मंडळ संचलित पंडित बाबुराव चौघुले बी-फार्मसी महाविद्यालयात बी-फार्मसीच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

भिवंडीतील साई सेवा शिक्षण मंडळ संचलित पंडित बाबुराव चौघुले बी-फार्मसी महाविद्यालयात बी-फार्मसीच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. राज्यात अतिवृष्टी व महापुराने थैमान घातल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून महापुरामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी बी-फार्मसी या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकले नाहीत. बी-फार्मसीत प्रवेश घेण्याची मुदत संपल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना बी-फार्मसीच्या शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहावे लागणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता एआयसीटीई बोर्ड दिल्ली, तसेच फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासनाने देशातील तसेच राज्यातील अतिवृष्टी आणि महापुराच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी बी फार्मसी साठी प्रवेश घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांनी बी-फार्मसी प्रवेशासाठी शासनाने दिलेल्या मुदतवाढीच्या संधीचा फायदा घेऊन तसेच साई सेवा शिक्षण मंडळ संचलित पंडित बाबुराव चौघुले बी-फार्मसी महाविद्यालयात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष महादेव चौघुले यांनी केली आहे. दरम्यान ‘यावर्षी पहिल्यांदाच भिवंडी सारख्या शहरात पहिल्यांदाच पंडित बाबुराव चौघुले बी-फार्मसी महाविद्यालयाची मान्यता मिळाली असून विद्यार्थ्यांना बी-फार्मसीसाठी बाहेरगावी लांबच्या महाविद्यालयांमध्ये जाण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. तसेच सध्या आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जागा देखील शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शासनाने बी-फार्मसीच्या प्रवेशासाठी दिलेल्या मुदतवाढ संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बी-फार्मसीसाठी प्रवेश घ्यावा’, अशी प्रतिक्रिया साई सेवा शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव चौघुले यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘मुख्यमंत्र्यांसाठी गुरुदक्षिणा म्हणून अंगठाही देईल पण तो अर्जुनासाठीच हवा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -