घरमहाराष्ट्र'मुख्यमंत्र्यांसाठी गुरुदक्षिणा म्हणून अंगठाही देईल पण तो अर्जुनासाठीच हवा'

‘मुख्यमंत्र्यांसाठी गुरुदक्षिणा म्हणून अंगठाही देईल पण तो अर्जुनासाठीच हवा’

Subscribe

महाजनादेश यात्रेत बीड येथील सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले राजकीय गुरु असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना महाभारतातील गुरु द्रौणाचाऱ्यांशी केली आहे. तर आपण एकलव्य शिष्य असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली महाजनादेश यात्रा मंगळवारी बीडला पहोचली. यावेळी महाजनादेश यात्रेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले राजकीय गुरु असून त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून आपण अंगठा देखील देण्यास तयार आहोत’, असे भाजपच्या नेत्या आणि महिला व बलाविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी महाभारतातील गुरु द्रौणाचार्य आणि एकलव्य शिष्याचा संदर्भ दिला. ‘द्रौणाचाऱ्यांचा अर्जून हा प्रिय शिष्य होता. अर्जूनापेक्षा कुणी मोठा होऊ नये म्हणून त्यांनी एकलव्याकडून अंगठा मागितला. गुरुसाठी अंगठा देण्याच्या परंपरेचे आपण आहोत. मात्र तो अंगठा अर्जुनाठीच असावा, दुसऱ्यांसाठी नाही’, असे सुतोवाच पंकजा मुंडे यांनी केले.

पंकजा मुंडे यांनी सोडली होती महाजनादेश यात्रा

पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. काल म्हणजे सोमवारी महाजनादेश यात्रा जेव्हा बीडला पोहचली तेव्हा मुख्यमंत्र्यांचे जागोजागी स्वागत केले जात होते. विनायम मेटे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विनायक मेटे जेव्हा रथवर चढले तेव्हा पंकजा मुंडे आणि डॉ. प्रितम मुंडे या दोन्ही भगीनी त्याच रथात होते. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतानंतर मुंडे भगीनी रथ खाली उतरल्या आणि महाजनादेश यात्रा सोडून निघून गेल्या. त्यामुळे ‘अंगठा अर्जुनासाठीच असावा’ या वाक्याचा या घटनेशीच काही संबंध असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – असं काय घडलं की मुंडे भगीनी रथ सोडून निघून गेल्या?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -