घरमुंबईजमिनीचा व्यवहार झाला असतानाही दुसर्‍या व्यक्तीला जमीन विकून फसवणुक

जमिनीचा व्यवहार झाला असतानाही दुसर्‍या व्यक्तीला जमीन विकून फसवणुक

Subscribe

मालवणीतील घटना; प्लॉट मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

जमिनीचा एका व्यक्तीशी व्यवहार झाला असतानाही दुसर्‍या व्यक्तीला तिच जमीन विकून सुमारे नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्लॉट मालकाविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. लवकरच या आरोपीची पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अमिरुल हरिष शेख हे मालाड परिसरात राहतात. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत त्यांची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्यांना त्याच्या मालकीची मालाड येथील मालवणी चर्च, मालवणी गावात 4761 चौरस फुटाची जमिन असल्याचे सांगितले होते. ही जमीन स्वस्तात देतो असे सांगून त्याने ती जमीन खरेदी करण्यास त्यांना प्रवृत्त केले होते. स्वस्तात जमीन मिळत असल्याने अमिरुल शेख यांनी त्याच्याशी जमिनीचा व्यवहार सुरु केला होता. टोकन मनी म्हणून त्यांनी त्याला नऊ लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्या डेव्हलपमेंट करारही झाला होता. मात्र ही जमिनी त्याने यापूर्वीच एका व्यक्तीला विकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

- Advertisement -

विक्री केलेल्या जमिनीचा व्यवहार करुन आरोपीने त्यांच्याशी नव्याने व्यवहार करुन टोकन मनी म्हणून नऊ लाख रुपये घेतले आणि त्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे त्यांनी मालवणी पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध बुधवारी 13 फेब्रुवारीला पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -