घरमुंबईरिलायन्स कार्यालयावर जाणारा शेतकऱ्यांचा मोर्चा वांद्र्यातच अडवला

रिलायन्स कार्यालयावर जाणारा शेतकऱ्यांचा मोर्चा वांद्र्यातच अडवला

Subscribe

रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणीच आज अडवण्यात आले. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होण्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांना रोखण्यात आले. मोर्चा बीकेसीत नेता येणार नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्याने शेतकरी आंदोलक काही काळासाठी आक्रमक झाले होते. पण शेतकऱ्यांनी मात्र आंदोलकांना वांद्र्यातच रोखून धरले. त्यानंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी ठाम होते. पण मुंबई पोलिसांकडून याठिकाणी बॅरिकेटींग करून आंदोलकांना रोखून ठेवण्यात आले.

रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. या आंदोलनात प्रहार, स्वाभीमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष यासारख्या विविध संघटनांचा समावेश आहे. देश पातळीवर नव्या कृषी विधेयकांना विरोध होत असतानाच त्याचाच भाग म्हणून आज रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काही काळ आक्रमक झालेल्या शेतकरी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले. शेतकऱी आंदोलकांनी यावेळी अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यानच्या काळात शेतकरी आंदोलकांनी बॅरिकेटींग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत शांतता होणार नाही तोवर सभेचे कामकाज सुरू होणार नाही असे शेतकरी नेत्यांकडून आंदोलकांना स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -