घरमुंबई'हाऊसफुल्ल ४' च्या ज्युनिअर आर्टिस्टनेही केला विनयभंगाचा आरोप

‘हाऊसफुल्ल ४’ च्या ज्युनिअर आर्टिस्टनेही केला विनयभंगाचा आरोप

Subscribe

पुन्हा एकदा 'हाऊसफुल्ल ४' च्या सेटवर विनयभंग झाल्याचा आरोप एका ज्युनिअर आर्टिस्टने केला आहे.

मीटू प्रकरणामुळे ‘हाऊसफुल्ल ४’ ला संकटाचे ग्रहण लागले आहे. दिग्दर्शक साजिद खानवर आलेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शन सोडले. तर तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपानंतर नाना पाटेकर यांनीही सिनेमातून काढता पाय काढला. आता पुन्हा एकदा ‘हाऊसफुल्ल ४’ च्या सेटवर विनयभंग झाल्याचा आरोप काल, गुरुवारी एका ज्युनिअर आर्टिस्टने केला आहे. त्याविरोधात तिने अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

वाचा : #MeToo: साजिद खानवर आता प्रियांकाचा आरोप

- Advertisement -

- Advertisement -

सहा जणांविरोधात तक्रार दाखल 

हाऊसफुल्ल ४ ची शूटिंग चित्रकूट स्टुडिओमध्ये सुरु असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती त्या महिलेने दिली. सहा जण एक ज्युनिअर आर्टिस्टसोबत भांडत होते. त्यातीलच एकाने आपला विनयभंग केल्याची माहिती तिने दिली. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे.

वाचा : #MeTooचे धक्के : आता साजिद खाननेच सोडला ‘Houseful 4’!

अशी घडली घटना

त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती महिला आणि तिचा सहकारी कलाकार एकत्र बसले असताना त्यावेळी पवन शेट्टी आणि सागर त्यांच्या इतर चार मित्रांसोबत तिथे आले आणि महिलेसोबत असलेल्या मित्राल जबरदस्ती घेऊन गेले. त्यांनी महिलेला धमकावले. या प्रकारात शेट्टीने महिलेला धक्का दिला आणि गैरवर्तणुक केले. या विरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -