घरमुंबईफिल्मसिटीमध्ये खंडण्या उकळणारा शिवा शेट्टी विरुद्ध गुन्हा दाखल

फिल्मसिटीमध्ये खंडण्या उकळणारा शिवा शेट्टी विरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

गोरेगाव फिल्मसिटी येथे चित्रपट तसेच मालिकाचे सेट उभ्या करणार्‍या कंत्राटदारांकडून खंडण्या उकळणार्‍या शिवा शेट्टी विरुद्ध आरे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये शिवा शेट्टी याची टोळी असून हि टोळी येथील कंत्राटदारांना मारहाण करून खंडण्या उकळण्याचे काम करते. शिवा शेट्टी याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोरेगाव फिल्मसिटी येथे चित्रपट आणि मालिकाचे सेट उभारण्याची कामे कंत्राटदारांना दिली जातात. या ठिकाणी शेकडो कंत्राटदार सेट उभे करण्याचे कामे करतात. या परिसरात शिवा शेट्टी हा आपली टोळी चालवत असून त्याच्या टोळीतील गुंड हे येथील कंत्राटदारांकडून धमकी देऊन मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचे काम करतात. खंडणी न देणार्‍या कंत्राटदाराला येथे काम करू देणार नसल्याची धमकी शिवा शेट्टी टोळीचे गुंड करतात. एका हिंदी मालिकेचा सेट बनवण्याचे काम येथील रणजित वीरेन या कंत्राटदाराला मिळाले आहे, मात्र या ठिकाणी काम करायचे असल्यास खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी शिव शेट्टीने कंत्राटदार वीरेन यांना दिली. वीरेन यांनी याकडे दुर्लक्ष करताच दोन दिवसांपूर्वी शिवा शेट्टी हा टोळीतील गुंडासह वीरेन याच्या सेटवर दाखल झाला.

- Advertisement -

शिवाने त्याचेकडे खंडणीची मागणी केली असता वीरेनने देण्यास नकार देताच शिवा आणि त्याच्या गुंडांनी कंत्राटदार वीरेन याला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी वीरेन यांनी आरे सब पोलीस ठाण्यात शिवा शेट्टी आणि त्याच्यासोबत असलेल्या गुंडा विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिवा आणि त्याच्या गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिव याच्याविरुद्ध या पूर्वी देखील असनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -