घरमुंबईमुंबईतील खड्डे १५ जूनपर्यंत बुजवण्याचे महापालिकेचे आदेश ; ८४ कोटी रुपयांची तरतूद

मुंबईतील खड्डे १५ जूनपर्यंत बुजवण्याचे महापालिकेचे आदेश ; ८४ कोटी रुपयांची तरतूद

Subscribe

मुंबई: मुंबईतील रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने २४ वार्डसाठी ८४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र येत्या १५ जूनपर्यंत सर्व खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी संबंधित खात्याचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व अभियंते यांना दिले आहेत.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसात व पावसाळ्यानंतरही रस्त्यांवर लहान – मोठे खड्डे पडतात. या खड्डयांकडे वेळीच लक्ष देऊन ते खड्डे तात्काळ न भरल्यास रस्त्यावर वाहन अपघात घडतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होते. जिवीत हानीसुद्धा होते. पालिका दरवर्षी रस्ते कामांवर किमान ३ हजार कोटी रुपये खर्च करते. मात्र रस्ते कामांवर वेळीच लक्ष न दिल्याने रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे होतात. त्याच रस्त्यांवर केबल लाईन टाकण्यासाठी चर खोदल्यास व ते नीटपणे न बुजविल्यास रस्त्यांवर खड्डे निर्माण होतात.

- Advertisement -

या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास खड्डे लहानाचे मोठे मोठे होत जातात. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी जास्त मटेरियल लागते. त्यामुळे खड्डे बुजविण्यास अधिक खर्च होतो. महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करते. मात्र खड्ड्यांची समस्या दरवर्षी उद्भवत असते. पालिका दरवर्षी ३१ मे पूर्वी म्हणजे पावसाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आवश्यक असते. यंदा पलिकेने खड्डे बुजविण्यासाठी १५ जूनपर्यन्त मुदतवाढ दिली आहे. तसेच, २४ वार्डात खड्डे बुजविण्यासाठी यंदा ‘री अँक्टीव्ह अस्फाल्ट रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, २ लाख १० हजार चौरस मीटरचे खड्डे बुजवण्यासाठी ८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

खड्डे बुजविण्यासाठी निधीची तरतूद

- Advertisement -

# शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी २७ कोटी रुपये

# पश्चिम उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी ३९ कोटी रुपये

# पूर्व उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी – १८ कोटी रुपये

एकूण – ८४ कोटी रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -