घरमुंबई'लोकलच्या गर्दी विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधा'; मध्य व पश्चिम रेल्वेचे सरकारला उत्तर

‘लोकलच्या गर्दी विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधा’; मध्य व पश्चिम रेल्वेचे सरकारला उत्तर

Subscribe

मुंबईतील सर्वसामान्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न केले जात होते. अखेर काल, बुधवारी राज्य सरकारने यासंदर्भात रेल्वेला पत्र पाठवले. राज्य सरकारच्या प्रस्तावाल मध्य व पश्चिम रेल्वेने उत्तर दिले असून गर्दीच्या विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने म्हटले आहे की, कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला ३५ लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला ९.६ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यसरकारने शोधला आहे त्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे, असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक रुपयासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

तसेच सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल चालवण्याचे प्रस्तावात नमूद केले होते. मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू असून प्रत्येक लोकलमध्ये २३ टक्के जागा या लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील. यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असे पश्चिम व मध्य रेल्वेने म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेली लोकल सेवा आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरु होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. सर्वांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, असे पत्र राज्य सरकारच्यावतीने रेल्वेला पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच महिला, वकील, डबेवाले आणि खासगी सुरक्षा रक्षक यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सरसकट सर्वच मुंबईकरांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशी संघटना आणि सर्वसामान्य मुंबईकरांकडून व्यक्त होत होती. राज्य सरकारच्यावतीने टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरु करण्याचा विचार मांडलेला आहे. यासाठी ठराविक वेळादेखील निश्चित करुन देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –

धक्कादायक: अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर उपाध्यक्षाची भररस्त्यात हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -