हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार यांचे निधन

नाशिक जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार (७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रतिभा आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा डॉ. चारुहास ठकार अमेरिकेत सिनसिनाटि विद्यापीठात किडनी विकारतज्ज्ञ व संधोधक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यवसायिकांना मार्गदर्शन केले. ते उत्तम छायाचित्रकार होते. ते नाशिक एज्युकेश्न सोसायटीचे विश्वस्त मंडळ सदस्य होते.