घरक्राइमधक्कादायक: अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर उपाध्यक्षाची भररस्त्यात हत्या

धक्कादायक: अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर उपाध्यक्षाची भररस्त्यात हत्या

Subscribe

अंबरनाथ येथील मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची सायंकाळी भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी राकेश पाटील यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंबरनाथ येथील पालेगाव परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे, याठिकाणी राकेश पाटील आले असताना त्यांच्यावर चार जणांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने पाटील यांच्यावर वार करण्यात आले, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

राकेश पाटील हे अंबरनाथ प्राचीन शिवमंदिराच्या पुजारी कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबरनाथ परिसरात त्यांचे चांगले प्रस्थ होते. पाटील यांनी अंबरनाथ गाव आणि परिसरात नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींसाठी अनेक कामे केली होती. तसेच नव्याने विकसित होत असलेल्या वस्तीतील पायाभूत सोयी-सुविधांकडेही त्यांनी पालिका आणि बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष वेधले होते. अंबरनाथमधील नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता होती.

- Advertisement -

सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाटील हे पालेगाव परिसरात आले असताना चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी पाटील यांनीही हल्लेखोरांचा प्रतिकार केला. मात्र हल्लोखोरांनी पाटील यांच्या शरिरावर अनेक ठिकाणी वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हल्लानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी चार संशयित आरोपींचा शोध सुरु केला आहे. हत्येनंतर अंबरनाथमध्ये वातावरण गरम झाल्यामुळे पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त लावला आहे. मनसेच्यावतीने या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

राकेश पाटील यांनी अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत होते. शहरातील नागरी समस्यांना घेऊन आक्रमक पद्धतीने काम करत होते. त्यामुळे राजकीय कारणांसाठी ही हत्या झाली आहे का? याचाही तपास पोलीस आता करत आहेत. अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -