घरताज्या घडामोडीSushant Suicide Case : रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल, सुशांतच्या वडिलांनी केली तक्रार!

Sushant Suicide Case : रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल, सुशांतच्या वडिलांनी केली तक्रार!

Subscribe

गेल्या महिन्याभरापासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात चौकशी सुरू असून या प्रकरणातला मंगळवारी पटना पोलिसांनी FIR दाखल केला आहे. पाटण्याच्या राजीवनगर पोलीस स्थानकात सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यावर FIR दाखल केली आहे. या प्रकरणात आजपर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये चित्रपट सृष्टीतल्या महेश भट्ट यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून हे जबाब नोंदवले जात असताना पाटणा पोलिसांनी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) सुशांतला प्रेमात फसवून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. दरम्यान, रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून ४ पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतनं त्याच्या वांद्र्यातल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी इतर संबंधितांसोबतच रिया चक्रवर्तीची देखील चौकशी केली होती. तब्बल ११ तास चौकशी केल्यानंतर रियाला पोलिसांनी सोडलं होतं. रियानं नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची देखील मागणी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या पोस्ट मार्टेम अहवालानुसार त्याचा मृत्यू फाशी लागल्यामुळे श्वास कोंडून झाल्यावर पोलिसांनीही शिक्कामोर्तब केलं आहे. आता त्याच्या पोटाच्या तपासणीचा आणि नखांचा फॉरेन्सिक अहवाल प्रतिक्षेत आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आत्तापर्यंत रिया चक्रवर्ती, आदित्य चोपडा, संजय लीला भन्साली, महेश भट्ट (Mahesh Bhatt) या बड्या बॉलिवुडकरांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात लवकरच करण जोहरचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -